टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१७

या अंकात २७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले

आज परदेशात जाऊन अनेक अविवाहित बहिणी सेवा करत आहेत. पण परदेशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेताना अनेक जण सुरवातीला कचरत होत्या. मग हा निर्णय घेण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? आणि त्या तिथे कोणकोणत्या गोष्टी शिकल्या? या विषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

“यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर”

जे करणं आपल्याला शक्य नाही ते करण्यास आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा नेहमी तयार असतो. पण आपणही प्रयत्न करावेत अशीही तो आपल्याकडून अपेक्षा करतो. तर मग, २०१७ सालचं वार्षिक वचन आपल्याला याबाबतीत योग्य दृष्टिकोन राखण्यास कशी मदत करू शकतं?

इच्छास्वातंत्र्य यहोवाकडून मिळालेली एक अमूल्य भेट

इच्छास्वातंत्र्य काय आहे आणि त्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आलं आहे? इतरांच्या इच्छास्वातंत्र्याची तुम्ही कदर करता हे तुम्ही कसं दाखवू शकता?

नम्र असणं गरजेचं का आहे?

नम्रता काय आहे आणि नम्रता दाखवण्यात कोणकोणत्या गोष्टी गोवलेल्या आहेत? हा महत्त्वपूर्ण गुण विकसित करणं गरजेचं का आहे?

आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो

आपण सर्व प्रसंगांत नम्रता कशी दाखवू शकतो? तसंच, आपली निंदा होत असताना किंवा आपली स्तुती होत असताना आणि भविष्यात काय होईल याची माहिती नसतानाही आपण नम्रता कशी टिकवून ठेवू शकतो?

योग्य अशा विश्वासू माणसांवर जबाबदारी सोपवून दे

संघटनेत जास्त जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी वयस्कर बांधव तरुणांना कशी मदत करू शकतात? तसंच अनेक वर्षं जबाबदारी हाताळलेल्या वयस्कर बांधवांप्रती तरुण बांधव आदर कसा दाखवू शकतात?

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन काळात आग ‘एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी’ कशी नेत असत?