व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?

संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?

आज जगात समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तुम्हालाही अलीकडे या वाढत्या समस्यांची झळ बसली आहे का? तुम्ही राहता त्या भागात खाली दिलेल्या समस्या पाहायला मिळतात का?

  • युद्ध किंवा दंगली

  • साथीचे रोग

  • नैसर्गिक विपत्ती

  • गरिबी

  • द्वेष आणि भेदभाव

  • हिंसक अपराध

वाईट घटना घडतात तेव्हा बरेच लोक हादरून जातात. आता काहीच आशा उरली नाही असं त्यांना वाटतं. त्यांच्या भावना बधिर होऊन जातात. पण बऱ्‍याच काळापर्यंत अशा सुन्‍न मनःस्थितीत राहिल्यामुळे आपलं जास्तच नुकसान होऊ शकतं.

म्हणूनच, एखादी वाईट घटना घडते, तेव्हा सुन्‍न मनःस्थितीत राहण्याऐवजी आपण काही पावलं उचलली पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांचं, आरोग्याचं, पोटापाण्याच्या साधनाचं आणि आपल्या मनाच्या शांतीचं आपल्याला संरक्षण करता येईल.

जगातल्या समस्यांचे तुमच्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलता येतील?