व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७६

येशू मंदिर शुद्ध करतो

येशू मंदिर शुद्ध करतो

इसवी सन ३० या वर्षी, एप्रिल महिन्याच्या आसपास येशू यरुशलेमला गेला. वल्हांडणाचा सण असल्यामुळे बरेच लोक त्या शहरात जमले होते. या सणाच्या वेळी ते मंदिरात प्राण्यांचं बलिदान अर्पण करायचे. यामुळे काही जण यरुशलेमला येतानाच आपल्यासोबत प्राणी घेऊन यायचे, तर काही तिथे आल्यावर प्राणी विकत घ्यायचे.

मंदिरात गेल्यावर येशूने पाहिलं, की तिथे काही माणसं प्राणी विकत होते. यहोवाची उपासना होत असलेल्या घरात, ते पैसे कमवत होते! हे सर्व पाहून येशूला खूप राग आला. त्याने दोऱ्‍यांचा एक चाबूक बनवला आणि सर्व गुराढोरांना व मेंढरांना मंदिरातून बाहेर हकलून लावलं. तसंच, त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांचे टेबलही उलटून टाकले आणि त्यांची सर्व नाणी जमिनीवर फेकून दिली. मग येशूने कबुतरे विकणाऱ्‍यांना म्हटलं: ‘काढून टाका हे सगळं इथून! माझ्या पित्याच्या घराला बाजार बनवू नका!’

येशूने जे केलं ते पाहून मंदिरात असलेले लोक चकित झाले. तेव्हा येशूच्या शिष्यांना मसीहाविषयी लिहिलेले शब्द आठवले: ‘यहोवाच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मी भरून जाईन.’

त्यानंतर इसवी सन ३३ या वर्षी येशूने पुन्हा एकदा मंदिर शुद्ध केलं. आपल्या पित्याच्या घराविषयी कोणीही अनादर दाखवल्यास, येशू ते मुळीच खपवून घेणार नव्हता.

“कोणताही सेवक दोन मालकांची सेवा करू शकत नाही.” —लूक १६:१३