नीतिवचनं १२:१-२८

  • “जो ताडनाचा तिरस्कार करतो, त्याला समज नसते” ()

  • “विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे” (१८)

  • शांती टिकवल्यामुळे आनंद मिळतो (२०)

  • “खोटं बोलणाऱ्‍या ओठांची यहोवाला घृणा वाटते” (२२)

  • “चिंतेने माणूस खचून जातो” (२५)

१२  जो शिक्षणावर प्रेम करतो, तो ज्ञानावर प्रेम करतो,+पण जो ताडनाचा तिरस्कार करतो, त्याला समज नसते.*+  २  चांगल्या माणसाला यहोवाची पसंती मिळते,पण जो दुष्ट योजना करतो, त्याला देव दोषी ठरवतो.+  ३  दुष्टपणा करणारे सुरक्षित राहू शकत नाहीत,+पण नीतिमान अशा झाडासारखा होईल, ज्याला उपटता येत नाही.  ४  सद्‌गुणी बायको आपल्या नवऱ्‍यासाठी मुकुटासारखी असते,+पण जी निर्लज्जपणे वागते, ती त्याच्या हाडांना सडवणाऱ्‍या रोगासारखी असते.+  ५  नीतिमानाचे विचार न्यायाचे असतात,पण दुष्टाचं मार्गदर्शन कपटी असतं.  ६  दुष्टांचे शब्द जीवघेण्या सापळ्यासारखे असतात,*+पण सरळ माणसांचे शब्द त्यांना वाचवतात.+  ७  दुष्टांचा नाश होतो तेव्हा त्यांचं नामोनिशाण राहत नाही,पण नीतिमानांचं घर कायम टिकून राहील.+  ८  विचार करून बोलणाऱ्‍या माणसाची प्रशंसा केली जाते,+पण कपटी मनाच्या माणसाला तुच्छ लेखलं जाईल.+  ९  प्रतिष्ठा मिरवून उपाशी राहणाऱ्‍या माणसापेक्षा,घरी एकच नोकर असलेला सर्वसामान्य माणूस बरा!+ १०  नीतिमान माणूस आपल्या गुराढोरांची* काळजी घेतो,+पण दुष्ट* क्रूर असतात. ११  आपल्या जमिनीची मशागत करणाऱ्‍याला भरपूर अन्‍न मिळेल,+पण निरुपयोगी गोष्टींच्या नादी लागणाऱ्‍याला समज नसते. १२  वाईट लोकांच्या लुटीचा दुष्टाला हेवा वाटतो,पण नीतिमान माणूस खोलवर मुळावलेल्या फलदायी झाडासारखा असतो. १३  दुष्ट माणूस आपल्याच तोंडून निघणाऱ्‍या वाईट गोष्टींमध्ये अडकतो,+पण नीतिमान संकटातून सुटतो. १४  माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+त्याच्या मेहनतीचं प्रतिफळ त्याला मिळेल. १५  मूर्खाला आपला मार्ग योग्यच वाटतो,+पण बुद्धिमान माणूस सल्ला स्वीकारतो.+ १६  मूर्ख आपला राग लगेच* दाखवतो,+पण शहाणा माणूस अपमानाकडे दुर्लक्ष करतो.* १७  खोटा साक्षीदार फसव्या गोष्टी बोलतो,पण जो प्रामाणिकपणे* साक्ष देतो, तो खरं* बोलेल. १८  विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात,पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.+ १९  खरं बोलणारे ओठ सर्वकाळ टिकून राहतील,+पण खोटं बोलणारी जीभ क्षणभरासाठी असते.+ २०  ज्यांच्या मनात कपट असतं, ते इतरांचं वाईट करण्याची योजना करतात,पण जे शांती टिकवण्याचा प्रयत्न करतात,* ते आनंदी असतात.+ २१  नीतिमानाचं कोणतंच नुकसान होणार नाही,+पण दुष्टांवर एकापाठोपाठ एक संकटं येतील.+ २२  खोटं बोलणाऱ्‍या ओठांची यहोवाला घृणा वाटते,+पण जे विश्‍वासूपणे वागतात त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो. २३  शहाणा माणूस आपल्याजवळ असलेली माहिती प्रकट करत नाही,पण मूर्ख आपला सगळा मूर्खपणा बोलून दाखवतो.+ २४  मेहनत करणारे राज्य करतील,+पण आळश्‍यांना सक्‍तीची मजुरी करावी लागेल.+ २५  मनातल्या चिंतेने माणूस खचून जातो,*+पण दिलासा देणाऱ्‍या शब्दांमुळे त्याला आनंद होतो.+ २६  नीतिमान माणूस आपली कुरणं विचारपूर्वक निवडतो,पण दुष्टांचा मार्ग त्यांना भरकटायला लावतो. २७  आळशी आपल्या शिकारीच्या मागे धावत नाही,+पण कष्टाळू वृत्ती, माणसाची मौल्यवान संपत्ती असते. २८  नीतिमत्त्वाचा मार्ग जीवनाकडे नेतो;+त्या वाटेवर मृत्यू नसतो.

तळटीपा

किंवा “तो बेअक्कल असतो.”
किंवा “लपून बसलेल्या मारेकऱ्‍यासारखे.” शब्दशः “रक्‍तासाठी टपून बसलेले असतात.”
किंवा “गुराढोरांच्या जिवाची.”
शब्दशः “दुष्टांची दया.”
किंवा “त्याच दिवशी.”
शब्दशः “झाकून टाकतो.”
किंवा “विश्‍वासूपणे.”
शब्दशः “जे नीतिमान आहे ते.”
शब्दशः “जे शांतीचे सल्लागार असतात.”
किंवा “निराश होतो.”