स्तोत्रं ९६:१-१३

  • “यहोवासाठी एक नवीन गीत गा”

    • यहोवा सर्वात स्तुतिपात्र ()

    • राष्ट्रांचे देव निरुपयोगी ()

    • पवित्र वस्त्र घालून उपासना ()

९६  यहोवासाठी एक नवीन गीत गा.+ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवासाठी गीत गा!+  २  यहोवासाठी गीत गा; त्याच्या नावाची स्तुती करा. त्याच्याकडून मिळणाऱ्‍या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश दररोज घोषित करा.+  ३  सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगा,सगळ्या लोकांना त्याच्या अद्‌भुत कार्यांबद्दल सांगा.+  ४  यहोवा महान आहे, तोच सर्वात जास्त स्तुतिपात्र आहे. इतर सर्व देवांपेक्षा तोच जास्त विस्मयकारक आहे.  ५  राष्ट्रांचे सगळे देव निरुपयोगी आहेत,+पण यहोवा तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.+  ६  वैभव* आणि ऐश्‍वर्य त्याच्यासमोर आहेत;+त्याच्या पवित्र ठिकाणात सामर्थ्य आणि सौंदर्य आहे.+  ७  राष्ट्रा-राष्ट्रांतल्या कुटुंबांनो, यहोवाचा सन्मान करा! यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!+  ८  यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा;+भेट घेऊन त्याच्या अंगणांत या.  ९  पवित्र वस्त्रं घालून* यहोवाला नमन करा;*पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, त्याच्यासमोर थरथर कापा! १०  राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: “यहोवा राजा बनला आहे!+ पृथ्वी* कायमची स्थिर करण्यात आली आहे, ती हलवता येणार नाही.* तो लोकांचा योग्य न्याय करेल.”*+ ११  आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित होवो;समुद्र आणि त्यातलं सर्वकाही गर्जना करो;+ १२  कुरणं आणि त्यांतलं सर्वकाही आनंदित होवो.+ जंगलातली सर्व झाडंही जल्लोष करोत.+ १३  ती यहोवासमोर जल्लोष करोत, कारण तो येत आहे,*तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे. तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.+

तळटीपा

किंवा “सन्मान.”
किंवा कदाचित, “त्याच्या पवित्रतेच्या वैभवामुळे.”
किंवा “उपासना करा.”
किंवा “उपजाऊ जमीन.”
किंवा “डळमळणार नाही.”
किंवा “लोकांची बाजू मांडेल.”
किंवा “आला आहे.”