व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“कायम जीवनाचा आनंद घ्या!”  हे पुस्तक वापरून यहोवा आणि येशूवरचा विश्‍वास वाढवा

“कायम जीवनाचा आनंद घ्या!”  हे पुस्तक वापरून यहोवा आणि येशूवरचा विश्‍वास वाढवा

देवाचं मन आनंदित करण्यासाठी बायबल विद्यार्थ्याने आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. (इब्री ११:६) यासाठी आपण त्यांना कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकाचा वापर करून मदत करू शकतो. अभ्यासासाठी असलेल्या या पुस्तकात काही महत्त्वाची वचनं, तर्काला पटतील असे मुद्दे, प्रभावी प्रश्‍न, मनाला भिडणारे व्हिडिओ आणि सुंदर चित्रं आहेत. जेव्हा आपण आपल्या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती गुण वाढवायला आणि देवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करतो, तेव्हा आपण खरंतर आगीतही टिकून राहील अशा साहित्याने बांधकाम करत असतो.—१कर ३:१२-१५.

आपण देवाला पाहू शकत नाही. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की त्याच्याशी मैत्री करणं शक्य नाही. म्हणून आपण त्यांना यहोवाची ओळख करून घ्यायला आणि त्याच्यावर भरवसा ठेवायला मदत केली पाहिजे.

“कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून यहोवावरचा विश्‍वास वाढवा  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीने चांगली तयारी केली होती हे कसं दिसून येतं?

  • विद्यार्थिनीला यशया ४१:१०, १३ ही वचनं समजून घ्यायला मदत करण्यासाठी बहिणीने छोट्या-छोट्या प्रश्‍नांचा वापर कसा केला?

  • व्हिडिओचा आणि वचनांचा विद्यार्थिनीवर कसा चांगला परिणाम झाला?

बऱ्‍याच लोकांना खंडणी बलिदान म्हणजे काय आणि हे बलिदान देऊन देवाने आपल्याला प्रेम कसं दाखवलं हे समजत नाही. (गल २:२०) म्हणून आपण त्यांना येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवायला मदत केली पाहिजे.

“कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून येशूवरचा विश्‍वास वाढवा  हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • अभ्यास घेणाऱ्‍या भावाने चांगली तयारी केली होती हे कसं दिसून येतं?

  • विद्यार्थ्याची गरज ओळखून त्याने “हेसुद्धा पाहा” या भागातल्या माहितीचा कसा वापर केला?

  • विद्यार्थ्यासाठी प्रार्थना करणं का महत्त्वाचं आहे?